breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळात शिवसेना पडणा-या उमेदवारांना तिकीट देणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  मावळ लोकसभेच्या निवडणुकीवरून भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी (दि.21) पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी डिवचले आहे. त्यांनी भाजप-शिवेसना युती झाली, तरी शिवसेना पडणा-या उमेदवाराला तिकिट देणार नाही, असे म्हणत खासदार बारणे हे पडणारे उमेदवार असल्याचे सुतवाच आमदार जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना केले.  

यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सरचिटणीस प्रमोद निसळ, शहर प्रवक्ते अमोल थोरात, नगरसेवक नामदेव ढाके, माजी महापौर आर.एस.कुमार, चेतन घुले आदी उपस्थित होते.

भाजप-शिवसेना युती झाल्यास आमदार जगतापांना माघार घ्यावी लागेल. अशी चर्चा असताना युती झाल्यानंतर लोकसभा लढविणार का, असे विचारले असता आमदार जगताप म्हणाले की, युती झाल्यानंतर देखील या मतदार संघातून शिवसेना पडणा-या उमेदवाराला तिकिट दिले जाणार नाही. शिवसेनेलाही हे ठाऊक असून शिवसेना पडणा-या उमेदवाराला रिंगणात उतरविणार नाही. भाजप-सेनेची युती झाल्यानंतर देखील हा मतदारसंघ भाजपला दिला जाण्याची शक्यता आहे. पक्षाच्या आदेश मिळाल्यास ही निवडणूक लढविण्याची तयारी आहे.  त्याबरोबर युती झाल्यानंतर जिंकणारा उमेदवार नसेल, तर त्याची कल्पना पक्षश्रेष्ठींना दिली जाईल. तसेच, युतीत पक्षाने कोणताही जिंकणारा उमेदवार दिला. तर त्याचे काम सर्व ताकदीनिशी करून त्याला निवडून आणण्यास मदत करू, असेही जगतापांनी स्पष्ट केले. मात्र, बारणे हे युतीसाठी जिंकणारे उमेदवार नसल्याचेही त्यांनी न बोलता सांगून टाकले.

तसेच महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी पक्षाविरोधात बोलल्यास आता चांगलेच महागात पडणार आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पक्षाविरोधात भूमिका मांडणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.  तसेच जे निवडून येऊ शकत नव्हते, ते भाजपच्या तिकीटावर निवडून येऊन नगरसेवक झालेत. काही मोजके नगरसेवक पक्षविरोधी भूमिका मांडत असल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षनेते तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्याबाबत आमची चर्चा झाली आहे. यापुढे कोणत्याही नगरसेवकाला पक्षाच्या भूमिकेबाबत काही अडचण असल्यास त्यांनी येऊन आमच्याशी सविस्तर चर्चा करावी. थेट पक्षाविरोधात कोणी बोलले अन्यथा भूमिका घेतली तर त्यांची आता व्यवस्था करणार आहे. पक्षविरोधात बोलणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button