breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायीला बसली आचारसंहितेची धास्ती;126 कोटींची उधळपट्टी

  • विषय पत्रिकेवर रस्त्याचे भरगच्च प्रस्ताव
  • मोजक्याच प्रभागांवर कोट्यवधींचा होणार खर्च

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील रस्ते विकास आणि डांबरीकरणाच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा धडाका लावला आहे. तब्बल 126 कोटींच्या खर्चाला उद्याच्या स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली जाणार आहे. येवढ्या खर्चाचे प्रस्ताव पालिका स्थापत्य विभागाने स्थायीपुढे आणले आहेत. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी कोट्यवधींच्या विषयांना मंजुरी देण्याच्या उद्देशाने स्थायीने खर्चाच्या मंजुरीची घाई लावल्याचे स्पष्ट होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील टेल्को रस्त्यावरील यशवंतनगर चौक ते नाशिक महामार्गाला जोडणा-या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. त्यासाठी मे. एस. के. येवले कंपनीकडून हे काम करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 8 कोटी 69 लाख रुपयांच्या खर्चाची निविदा आहे. प्रभाग क्रमांक 11 सेक्टर नंबर 20 मधील रस्त्यावर 1 कोटी 2 लाखांचा खर्च होणार आहे. त्यासाठी मे. परमानंद ए. क्रिपलानी या ठेकेदाराची नेमणूक केली आहे. ताथवडे प्रभाग 25 मधील रस्ते विकसित करण्यासाठी 4 कोटी 48 लाखांचा खर्च अधोरेखीत केला आहे. हे काम मे. श्रीगणेश कन्स्ट्रक्शन संस्थेला दिले आहे.

प्रभाग 8 मधील सेक्टर 7, 10 आणि एमआयडीसी व प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव स्थापत्य विभागाने स्थायीपुढे आणला आहे. या कामासाठी तब्बल 8 कोटी 66 लाख एवढा खर्च दाखविण्यात आला आहे. या कामासाठी मे. श्रीगणेश कन्ट्रक्शनची नेमणूक केली आहे. पुन्हा याच प्रभागातील उर्वरीत रस्ते डांबरीकरण करण्याचा स्वतंत्र विषय मांडला आहे. हे काम त्याच ठेकेदाराला दिले आहे. त्यासाठी 8 कोटी 66 लाख एवढा खर्च दाखविण्यात आला आहे. यामुळे प्रभाग 8 मधील रस्त्यांचे डांबरीकरण आणि रस्ते विकास करण्यासाठी 17 कोटी रुपये खर्च होत आहेत. प्रभाग 3 मोशी गावठाणातील लक्ष्मीनगर भागातले रस्ते तयार करण्याचे काम मे. धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. त्यावर 8 कोटी 51 लाख एवढा खर्च करण्याचे प्रशासनाने सूचविले आहे.

याच प्रभागातील मोशीतल्या आदर्शनगर भागातील रस्ते तयार करण्याचे काम मे. टी. अण्ड टी. इंफ्रा. प्रा. लि. कंपनीला दिले आहे. या कामासाठी 12 लाख 71 लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. एवढे पैसे पालिका प्रशासन संबंधित ठेकेदाराला देणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील रस्त्यांसाठी 21 कोटींच्या खर्चाचा धडाका लावला जात आहे. च-होली येथील सर्व्हे क्रमांक 7 ते महापालिका हद्दीपर्यंतचा विकास आराखड्यातील 30 मीटरचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्याचे काम मे. मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी 42 कोटी 77 लाख एवढा खर्च येत आहे. या प्रभाग 3 साठीच सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी एकाचवेळी वळविण्यात आला आहे. या खर्चावरून सत्ताधा-यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

प्रभाग 26 मधील विशालनगर वाघजाई हॉटेल ते कस्पटे चौकपर्यंत 24 मीटर सिमेंट काँक्रीटचा डीपी रस्ता करण्यात येणार आहे. हे काम मे. इंगावले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. त्यासाठी 9 कोटी 30 लाख एवढा खर्च होणार आहे. तर, प्रभाग 16 मधील किवळे, विकासनगर येथील नव्याने ताब्यात आलेल्या डीपी व डीपी विरहित रस्त्यांच्या विकासासाठी 10 कोटी 76 लाख एवढा खर्च अपेक्षीत आहे. या कामासाठी मे. बी. के. खोसे यांची नेमणूक केली आहे. पुन्हा याच प्रभागातील विकासनगर येथील नाल्याकडील पेट्रोल पंप ते बापदेवनगर हा 18 मीटर डीपी रस्ता करण्यासाठी 16 कोटी 32 लाख एवढा खर्च निर्धारित केला आहे. हे काम धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे.

 

स्थायीला झाली आचारसंहितेची घाई

स्थायी समतीचा कार्यकाळ मार्चअखेर संपुष्टात येत आहे. त्यातच लोकसभा निवडणुका जवळ आल्याने मार्चच्या सुरूवातीलाच निवडणूक आयोगाची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या कामकाजासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंतचा अवधी राहिला आहे. हे ओळखूनच स्थायीने कोट्यवधी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. म्हणूनच 126 कोटींहून अधिक खर्चाची कामे विषय पत्रिकेवर आणली आहेत. उद्या मंगळवारी (दि. 29) होणा-या स्थायी समिती सभेत या खर्चाला मान्यता देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button