breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Budget 2020 : भारतीय रेल्वेवर नव्या संकल्पांचा वर्षाव होणार!

नवी दिल्ली | Budget 2020 शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशाचा आर्थिक विकास, भविष्यातील योजना आणि एकंदर सद्यस्थितीला असणारी देशाची अर्थव्यवस्था हे निकष नजरेत घेत यंदाच्या अर्थसंकल्पात समतोल राखण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आला.

अर्थसंकल्प सादर करतेवेळी देशात मोठ्या प्रमाणात वापरात असणाऱ्या आणि सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेल्या रेल्वे खात्यासाठीसुधा अर्थमंत्र्यांनी विशेष घोषणा केल्या.

भारतीय रेल्वेमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल अर्थात PPP model अंतर्गत किसान रेल्वेची घोषणा त्यांनी केली. शेतमालाच्या वाहतुकीसाठी याचा वापर होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संसदेत अर्थसंकल्प सादर करतेवेळी सीतारामन यांनी देशातील जवळपास एक हजार रेल्वे स्थानकं ही हाय स्पीड वायफायशी जोडली जाणार आहेत.

२७००० किलोमीटर इलेक्ट्रॉनिक रेल्वेमार्गांच्या उभारणीलाही प्राधान्य दिलं जाणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने रेल्वे क्षेत्रातही एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या कालात सरकारकडून ‘तेजस एक्स्प्रेस’ प्रमाणे आणखी रेल्वे सुरु करण्यात येणार आहेत. तेजस एक्स्प्रेस ही एसी चेअर कार रेल्वे असून, त्याला लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रेल्वे क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका पाहता, मोदी सरकारकडून यामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. ज्यासाठी जवळपास १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. ज्यामध्ये रेल्वे स्थानकं, विमानतळं, सिंचन योजनांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button