breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्मचाऱ्यांना कोठूनही काम करण्याची मुभा

मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) देशातील सर्वात मोठी बँक आहे. आपल्या दोन लाख कर्मचार्‍यांना कोठूनही काम करण्याची मुभा दिली आहे. आपल्या कर्मचार्‍यांना कोणत्याही ठिकाणाहून काम करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी धोरण अवलंबिले आहे. कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर एसबीआय ग्राहकांच्या हितासाठी कॉन्टॅक्ट कमी आणि डिजिटल बँकिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आता पुढाका घेतला आहे.

होम फॉर्म वर्कला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे १००० कोटी रुपयांची बचत होईल, असे एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना सांगितले. देशातील अग्रेसर बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘कोठूनही काम करा’ धाटणीची लवचीक कार्यप्रणाली विकसित केली असून, त्यायोगे वर्षांला १,००० कोटी रुपयांची खर्चात बचत साधली जाणे अपेक्षित आहे. बँकेच अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आगामी वाटचालीविषयी भाष्य केले. खर्चात काटकसर, मनुष्यबळाचे सुसूत्रीकरण, कर्मचाऱ्यांचे कौशल्य पुनर्विकास, उत्पादकतेत सुधारणा आणि प्रशासकीय कार्यालय ते विक्रीत कार्यरत कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन अशा कार्यसूत्रांद्वारे वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरात सर्वत्र व्यवहारात आणली जात असलेली ‘कुठूनही काम करण्याची’ कार्यपद्धतीची अंमलबजावणी करताना, कर्मचाऱ्यांनी काम आणि व्यक्तिगत जीवनात संतुलनाचा सामाजिक पैलू सांभाळावा, असे आवाहन रजनीश कुमार यांनी केले. तब्बल ४४ कोटींहून अधिक ग्राहक असलेल्या स्टेट बँकेची डिजिटल बँकिंग वाहिनी असलेल्या ‘एसबीआय योनो’ आणि मोबाइल अ‍ॅपने मागील तीन महिन्यांत लक्षणीय प्रगती साधली आहे, असे कुमार यांनी सांगितले. पुढील सहा महिन्यांत योनोचे वापरकर्ते दुप्पट करण्याचे उद्दिष्ट राखले असल्याचे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button