breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना अलर्ट जारी

मुंबई – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना अलर्ट राहण्याचे आवाहन केले आहे. एसबीआय बँकेच्या नावावर ग्राहकांना बनावट ईमेल पाठवला जात असल्याचे बँकेने म्हटले आहे. याबाबत आपल्या ग्राहकांना सावध राहण्याचे आवाहन करत बँकेने ट्विटरद्वारे म्हटले आहे की, एसबीआयच्या नावे जर तुम्हाला खोटा आणि बनावट ईमेल आला तर त्यास अजिबात उत्तर देऊ नका. तसेच ग्राहकांनी बँकेच्या नावे आलेला मेल खरा आहे की फसवणुकीसाठी आहे याची खात्री नक्की करून घ्यावी, असेही बँकेने म्हटले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट केले आहे की, ‘बँक ग्राहकांना विनंती करत आहे की त्यांनी सोशल मीडियावर अलर्ट राहावे. कोणत्याही दिशाभूल आणि बनावट मेसेजद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते. यामुळे ग्राहकांनी कुठल्याही मेसेजवर आपली खासगी माहिती शेअर करण्याआधी तपासणी करावी.’ त्याचबरोबर एसबीआयने ग्राहकांना अलर्ट करण्यासाठी एक व्हीडिओदेखील शेअर केला आहे. यामध्ये आपली कोणतीही खासगी माहिती ऑनलाईन शेअर करू नका असे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे. तसेच बँकेने यामध्ये सावधान, सुरक्षित आणि आलेला मेसेज खरा की फसवणुकीसाठी आहे याची तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे बँकेने ग्राहकांना स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या बँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचाच वापर करा. जर तुम्ही या सूचनेकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button