breaking-newsमनोरंजन

सौदीत 35 वर्षानंतर भारतीय चित्रपट प्रदर्शित

सुपरस्टार रजनीकांत याचा “काला’ चित्रपट गुरुवारी देशभरात तब्बल 2500 स्क्रीनवर एकावेळी रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्‍स ऑफिसवर तुफान गर्दी जमविली. काला हा चित्रपट देशासह विदेशातही लोकप्रिय ठरत आहे. सौदीमध्ये 35 वर्षांच्या बंदीनंतर बॉलीवुडमधील “काला’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून तो पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.

या संदर्भात रजनीकांत यांचे जावई आणि अभिनेते धनुष यांनी ट्विटरवर माहिती देताना फक्त थालावियाच हे करू शकतात, असे पोस्ट केले आहे. 1970 च्या दशकापासून सौदी अरेबियात चित्रपटगृहांवर बंदी होती. ती सौदी राजकुमार सलमान यांच्या प्रयत्नातून नुकतीच मागे घेण्यात आली आहे. त्यानंतर हॉलीवूडचा ब्लॅक पॅंथर तेथे रिलीज झालेला पहिला चित्रपट होता.

सौदीत भारतीय वंशाचे अनेक कामगार असून त्यात दक्षिण भारतीयांचे प्रमाण अधिक आहे. त्यांना रजनीकांतच्या “काला’ चित्रपटाची प्रतीक्षा होती, ती आता पूर्ण झाली आहे. “काला’ने रिलीजपूर्वीचा भक्कम कमाई केली असून त्याचे थिएटर, सॅटेलाइट, डिजिटल हक्क 250 कोटींना विकले गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button