breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: अकोल्यात आणखी एक मृत्यू; ३० रुग्णांची संख्या वाढली

अकोला : करोनामुळे आणखी एक मृत्यू व ३० नव्या रुग्णांची नोंद शुक्रवारी झाली आहे. शहरातील एका वयोवृद्ध रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५९ जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ११३६ झाली आहे. अकोला जिल्ह्यात रुग्णवाढीसोबतच मृत्यू संख्येने अद्याापही थांबण्याचे नाव घेतले नाही. मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. शहरात ६ ते १८ जूनपर्यंत सलग १३ दिवसांत करोनाबाधितांचा दररोज मृत्यू होत आहे. या कालावधीत तब्बल २५ जण दगावले. जिल्ह्यातील एकूण २७७ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २४७ अहवाल नकारात्मक, तर ३० जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ११३६ वर पोहचली. सध्या रुग्णालयात ३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल (दि.१८) रात्री उपचार घेताना हरिहरपेठ भागातील रहिवासी ८२ वर्षीय रुग्णाचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज दिवसभरात ३० जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळी प्राप्त अहवालात १५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात आठ महिला व सात पुरुष आहे. अकोट फैल येथील पाच, बाळापूर चार, तर जेतवन नगर, कान्हेरी सरप, भारती प्लॉट, जुने शहर, मोठी उमरी, बार्शिटाकळी येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. आज सायंकाळच्या अहवालानुसार आणखी १५ रुग्णांची भर पडली. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत. त्यात अकोट फैल तीन, सिंधी कॅम्प, धोबी खदान, अशोक नगर येथील प्रत्येकी दोन, तर अनिकट, आदर्श कॉलनी, अकोट, बाळापूर, हरिहरपेठ व आंबेडकर चौक येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. नव्या भागात करोनाबाधित आढळून आल्यास ते परिसर तात्काळ प्रतिबंधित करण्यात येत आहे. रुग्णांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तपासणी करून लक्षणे असल्यास नमुने घेतले जात आहे. शहरात संकलन केंद्र वाढल्याने नमुने घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button