breaking-newsआंतरराष्टीय

काश्‍मीरला भारताचा भाग दाखवल्याने पाकिस्तानचे पित्त खवळले

  • समाजशास्त्राच्या पुस्तकांवर घातली बंदी

लाहोर – काश्‍मीरला भारताचा भाग दाखवल्याने पाकिस्तानचे पित्त खवळले आहे. संबंधित चूक गंभीर असल्याची आदळआपट करत त्या देशाने समाजशास्त्राच्या पुस्तकांवरच बंदी घातली आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खासगी शाळांच्या समाजशास्त्रातील पुस्तकांमध्ये त्या देशाचा नकाशा छापण्यात आला आहे. त्या नकाशात काश्‍मीरला भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यामुळे काश्‍मीरवर कायम वक्रदृष्टी ठेवणाऱ्या पाकिस्तानचे माथे भडकले. पाकिस्तान सरकारच्या अखत्यारीतील पंजाब प्रांताच्या अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके मंडळाने (पीसीटीबी) तातडीने पाऊले उचलत खासगी शाळांच्या प्रशासनाविरोधात आणि पाठ्यपुस्तकांच्या प्रकाशकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या उद्देशातून लाहोर पोलिसांत तक्रार दाखल केली.

पीसीटीबीने लगोलग फर्मान जारी करून पंजाब प्रांतात सर्व संबंधित पुस्तकांवर बंदी घालण्याचे फर्मान सोडले. याशिवाय, ती पुस्तके जप्त करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. काश्‍मीरला भारताचा भाग दाखवणाऱ्या नकाशाची पुस्तके दुसरी, चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी इयत्तांसाठी होती. पाकिस्तानची काश्‍मीरवर वाकडी नजर असल्याचे सर्वश्रुत आहे. काश्‍मीर आमचा अविभाज्य भाग असल्याचे वास्तव भारताने ठामपणे आणि सातत्याने ठणकावून सांगूनही त्या देशाची नापाक वक्रदृष्टी कायम आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button