breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोशल मीडियावर झालेल्या मित्राने विवाहित महिलेवर केला बलात्कार

पिंपरी, (महाईन्यूज) – सोशल मीडियावर मैत्री झालेल्या मित्राने पहिल्या नव-याला तलाक दिल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार केला. तिचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

याप्रकरणी दिघी रोडवरील एका २७ वर्षाच्या महिलेने भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी बादशहा ऊर्फ रतीन गुप्ता (रा. सतनाम, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केवळ सोशल मिडियावर झालेली ओळख इतकीच माहिती असताना एखाद्याला घरात घेऊन त्याला रात्री मुक्कामाला ठेवणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिलेची सोशल मिडियावर ओळख झाली होती. या ओळखीवरुन तो २२ मार्च रोजी तिच्या आदर्शनगर येथील घरी आला. रात्री उशीर झाला म्हणून तिने त्याला घरीच थांबवून घेतले. मध्यरात्री ते बेडरुममध्ये शेजारी बसून बोलत बसले असताना या महिलेला तुझ्या नवऱ्याने सोडल्यानंतर तुझ्याशी लग्न करेल, असे आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

अर्धनग्न अवस्थेतील फोटो व दोघांनी एकत्र काढलेले फोटो हॅलो अ‍ॅपवर अपलोड केले व ते फोटो त्याने तिच्या पतीच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले. त्यावरुन पतीपत्नीत भांडणे झाली. त्यानंतर या महिलेने आपली बदनामी केली म्हणून बादशहा ऊर्फ रतिन गुप्ता याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button