breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सोशल डिस्टन्सिंगमुळे कोरोनाचा धोका 62 टक्के घटतो

इंडियन जर्नल आॅफ मेडिकल रिसर्चमध्ये दावा

मुंबई – सोशल डिस्टन्सिंगमुळे (समाज अंतर) कोरोनाचा धोका तब्बल ६२ टक्क्यांनी कमी होतो आणि साथीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तेव्हा तर संक्रमणाचा धोका ८९ टक्क्यांनी कमी होतो, असा दावा इंडियन जर्नल आॅफ मेडिकल रिसर्च या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनापुढे आाणणाऱ्या पत्रिकेत करण्यात आला आहे.


आसीएमआर संस्थेच्या इंडियन जर्नल आॅल मेडिकल रिसर्च पत्रिकेच्या फेब्रुवारी २०२० च्या अंकात सदर संशोधन प्रकाशित केलेले आहे. संदीप मंडल, तरुण भटनागर, रमन गंगाखेडकर, स्वरूप सरकार या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणासंदर्भात काही निष्कर्ष मांडले आहेत.


त्यात म्हटले आहे की, ‘कोरोनाच्या एका रुग्णाकडून १.५ ते ४.९ व्यक्तींना त्याची लागण होण्याची शक्यता असते. कोविड -१९ चे संक्रमण रोखण्यासंदर्भात सोशल डिस्टन्सिंगचा निर्णय घेण्यास केलेला एक आठवड्याचा विलंब महागात पडू शकतो. या विषाणूने एकदा समुदायात प्रवेश केल्यास आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येतो. तसेच मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button