breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जूनी सांगवी डीपी रोडवरील अनधिकृत बांधकामाच्या कारवाईला ‘ब्रेक’

  • मधुबन सोसायटीच्या 35 अनधिकृत बांधकामावरील कारवाई थांबवली

पिंपरी ( महा ई न्यूज ) – सांगवी येथील महापालिकेच्या 18 मीटर विकास आराखडा रस्त्यावरील तीन इमारतीच्या 35 अनधिकृत बांधकामावर सोमवारी (दि. 3 जून) कारवाई करण्यात येणार होती. मात्र, तेथील 12 नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने पालिकेच्या कारवाईस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नागरिकांनी केलेल्या बांधकामाच्या गुंठेवारी कागदपत्राची तपासणी करुन तीन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिका बांधकाम विभागास उच्च न्यायालयाने दिले आहेत. या स्थगितीमुळे महापालिका बांधकाम विभागाच्या प्रस्तावित कारवाईला ब्रेक लागला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 18 मीटर विकास आराखडा रस्त्यावर मधुबन सोसायटी उभारली आहे. तेथील तीन इमारतीतील 35 बांधकामे अनधिकृत आहेत. त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिका बांधकाम विभागाने जोरदार तयारी केली होती. तेथील रहिवाशी नागरिकांना जानेवारी महिन्यातच नोटीस बजावली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुक आचारसंहितेमुळे चार महिने कारवाई लांबली होती.

आचारसंहिता संपताच महापालिका बांधकाम विभागाने सोमवारी (दि.3 जून) मधुबन सोसायटीच्या तीन इमारती 35 बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात येणार होता. त्यानूसार महापालिकेने आवश्यक यंत्रसामुग्री तयार करुन शंभर पोलिस कर्मचा-यांचा मनुष्यबळ घेतले होते. मात्र, तेथील 12 रहिवाशी नागरिक उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी उच्च न्यायालयात बांधकामाच्या गुंठेवारी केल्याबाबत आवश्यक कागदोपत्र सादर केली. त्यामुळे अनधिकृत बांधकामाच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच रहिवाशी नागरिकांच्या गुंठेवारी कागदपत्राची शहनिशा करुन योग्य हरकती सुनावणी घ्यावी, तीन आठवड्यात अहवाल सादर करावा, अशा सुचना बांधकाम विभागास दिल्या आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागाने जून्या सांगवीतील 18 मीटर विकास आराखडा 35 अनधिकृत बांधकामावर कारवाईला ब्रेक लागला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button