breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोलापूर महापालिकेचे उपमहापाैर राजेश काळेंना अटक

सोलापूर – सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंना अखेर अटक करण्यात आली आहे. महापालिका उपायुक्‍तांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. अखेर त्यांना पडकण्यात पोलिसांना यश आले.

महारनगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर व उपायुक्तांना शिवीगाळ करून उपायुक्तांना ५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच उपमहापौर राजेश काळे फरार झाले होते.

काळेंविरोधात महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती यात म्हटले आहे की, एका सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिसरात ई-टॉयलेट, कचरापेट्या व इतर साहित्यांची व्यवस्था करावी. यासाठी भाजपचे उपमहापौर राजेश काळे हे झोन अधिकार्‍यांना फोन करून शिवीगाळ करीत होते. प्रशासनाच्या मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही नियमबाह्य पध्दतीने नेता येणार नाही.

तुम्ही शासकीय नियमानुसार यापुर्वीच पत्रव्यवहार करणे गरजेचे होते. असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले होते. यावरून संतापलेल्या उपमहापौर राजेश काळे यांनी उपआयुक्त धनराज पांडे, झोन अधिकारी नीलकंठ मठपती यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर काळे यांनी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनाही फोन करून शिवीगाळ केली होती. उपायुक्त धनराज पांडे यांना ५ लाखाची खंडणी मागितली, असेही फिर्यादीत म्हटले होते.

या फिर्यादीवरून भारतीय जनता पक्षाचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरूध्द अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, खंडणी मागणे, अन्वये भादंवि कलम ३४३, ३८५, ५०४, ५०६, २९४ प्रमाणे सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपमहापौर राजेश काळे यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button