breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पोलीस कोठडीत असलेले सचिन वाझे यांचं मुंबई पोलीस खात्यातून निलंबन

मुंबई – प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेले स्फोटक आणि या प्रकरणातून मनसुख हिरेन यांची झालेले मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांना काल 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज वाझे यांना आणखी एक धक्का बसला आहे. वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. सध्या कोठडीत असलेल्या वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याची मागणी केली जात होती.

वाचा :-‘शिवसेनेला मुकेश अंबानींकडून पैसे काढायचे होते’, निलेश राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी

गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्ष (सीआययू) या अत्यंत संवेदनशील, महत्त्वाच्या विभागाचे प्रमुख असलेल्या वाझे यांना शनिवारी रात्री १२ च्या सुमारास ‘एनआयए’ने अटक केली. अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा ‘एनआयए’कडून करण्यात आला. ‘‘हे कृत्य वाझे यांनी कबूल केले आहे. मात्र अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवणे, अंबानी कुटुंबाला धमकावण्याचा कट त्यांनी एकट्याने रचलेला नाही. या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असाव्यात’’, असा संशय असल्याचे ‘एनआयए’कडून सांगण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button