breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण; तर,सोन्याचा भाव 50 हजारांखाली

भांडवली बाजारात गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचं पहायला मिळालं. काही शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजारांखाली गेला आहे. मागील काही दिवस सोने आणि चांदीच्या दरात सुरु असलेली घसरण गुरुवारी देखील कायम आहे. सध्या मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर सोने २४ रुपयांनी कमी झाले असून त्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१७५५ रुपये झाला आहे. चांदीचा भाव १०९ रुपयांनी कमी झाला असून तो एक किलोला ६७४२० रुपये आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांतील घसरणीमुळे सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजारांखाली आला आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १९५२ डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव ०.९ टक्के घसरला असून तो प्रती औंस २७.३० डॉलर आहे. डॉलर इंडेक्समध्ये ०.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. बुधवारी कमाॅडिटी बाजारात सोने ९०० रुपयांनी वधारले होतं.


अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर ०.२ टक्क्यांनी कमी झाले होते. त्यामुळे सुरक्षित असलेल्या या मौल्यवान धातूकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून आला. युरोझोनमधील रखडलेली वसुली व अमेरिकी धोरणकर्त्यांची चिंता वाढत असूनही सलग दोन आठवडे तोटा होऊनही सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button