breaking-newsपुणेमहाराष्ट्र

एमपीएससी लोगोचा गैरवापर झाल्यास होणार कारवाई

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कार्यालयाचे नाव, लोगो व मुद्रेचा वापर काही संस्था व व्यक्‍तींकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही गंभीर बाब असून, आयोगाच्या लोगो व मुद्रेचा वापर करू नये अन्यथा संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

हल्ली आयोगाच्या लोगोचा अनधिकृतपणे गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याबाबतच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून, याकडे आयोगाने लक्ष वेधले. आयोगाच्या लोगोचा व मुद्रेचा वापर करता येत नाही. मात्र असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्‍ती अथवा संस्थेच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई होईल, असे आयोगाने गुरुवारी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button