breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL2020: मुंबईचा कोलकातावर 8 गडी राखून विजय; पॉईंट टेबलमध्ये मुंबई अव्वलस्थानी

दुबई – आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी केली आहे. कोलकताविरोद्धच्या सामान्यात 8 गडी राखून मुंबईने दणदणीत विजय मिळवलाय. यासाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकची नाबाद अर्धशतकी कामी आली.

कोलकाताच्या संघाने पॅट कमिन्सच्या अर्धशतकाच्या मदतीने १४८ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना डी कॉक ७८ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वलस्थानी विराजमान झाला.

क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा जोडीने १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरूवात केली. डी कॉकने अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितने फटकेबाजीस सुरूवात केली होती, पण तो ३५ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवही १० धावांवर बाद झाला. पण डी कॉक मात्र फटकेबाजी करत राहिला. त्याने ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४४ चेंडूत नाबाद ७८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने ११ चेंडूत २१ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.

सुरुवातीलाच कोलकाताचा नवा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली पण त्याचा निर्णय फसला. सलामीवीर राहुल त्रिपाठी ७ धावांवर बाद झाला. नितीश राणाही ५ धावांवर थांबला. खेळपट्टीवर स्थिरावलेला शुबमन गिलही चुकीच्या फटक्यामुळे झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २१ धावा केल्या.

पुढच्याच चेंडूवर दिनेश कार्तिकही ४ धावांवर बाद झाला. राहुल चहरने २ चेंडूमध्ये २ बळी टिपत कोलकाताची अवस्था वाईट केली. पाठोपाठ आंद्रे रसलही अयशस्वी ठरला. पण कर्णधार इयॉन मॉर्गन-अष्टपैलू पॅट कमिन्स या जोडीने कोलकाताचा डाव सावरला. या दोघांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकून संघाला १४८पर्यंत मजल मारून दिली. पॅट कमिन्सने पहिले अर्धशतक ठोकत नाबाद ५३ धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने नाबाद ३९ धावा केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button