breaking-newsक्रिडा

सेरेनाकडून बेशिस्त वर्तन

या सामन्यातील दुसऱ्या सेटच्या वेळी सेरेनाला स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिने जमिनीवर रॅकेट आपटल्यानंतर पंच कालरेस रामोस यांनी तिला ताकीद दिली. पुन्हा तिच्याकडून बेशिस्त वर्तन झाल्यानंतर पंचांनी तिच्याविरुद्ध ओसाकाला एक गुण बहाल केला. त्यातच तिला  प्रशिक्षकाकडून सल्ला मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंच रामोस यांनी तिला पुन्हा ताकीद दिली. त्यामुळे चिडलेल्या सेरेनाने त्यांना चोर, खोटारडे असे म्हटले व तुम्ही माझ्या वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडवित आहात असाही आरोप तिने पंचांवर केला.

नव्या युगाची आशा.. ओसाका! कारकीर्दीतील पहिले ऐतिहासिक विजेतेपद

कारकीर्दीत पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाका हिने शनिवारी मध्यरात्री अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या ऐतिहासिक विजेतेपदाला गवसणी घातली. तिने सुपरमॉम सेरेना विल्यम्सच्या स्वप्नवत अजिंक्यपद मिळविण्याच्या मनसुब्यास धक्का दिला. ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविणारी पहिली जपानी खेळाडू होण्याचा मान ओसाका हिने मिळविला. हा सामना सेरेना हिने पंचांबद्दल अपशब्द उच्चारल्यामुळेही गाजला.

२० वर्षीय ओसाकाने एकतर्फी झालेला हा सामना ६-२, ६-४ असा जिंकला. गतवर्षी कन्येस जन्म दिल्यानंतर पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविण्याचे ध्येय सेरेना हिला साकार करता आले नाही. त्याचप्रमाणे मार्गारेट कोर्ट हिने केलेल्या २४ ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या विक्रमाचीही सेरेना हिला बरोबरी साधता आली नाही. या विजयामुळे ओसाकाने जपानच्या असंख्य चाहत्यांना जल्लोष करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली.

ओसाका हिने यंदा इंडियन वेल्स स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धेत तिने प्रथमच अंतिम फेरी गाठली होती. सेरेनाविरुद्धच्या लढतीत पहिल्या सेटमध्ये ओसाका हिने सेरेनाच्या दुहेरी चुकांचा फायदा घेत २-१ अशी आघाडी घेतली. पुन्हा तिने दुसऱ्यांदा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवित ४-१ अशी आघाडी वाढविली. सेरेना हिला पुढच्या गेममध्ये सव्‍‌र्हिसब्रेकची संधी मिळाली होती मात्र ओसाका हिने खोलवर सव्‍‌र्हिस करीत तिला या संधीपासून वंचित ठेवले.

पहिला सेट जिंकल्यानंतर ओसाका हिचा आत्मविश्वास उंचावला, तर सेरेना हिला खेळावर व वर्तनावर नियंत्रण ठेवता आले नाही. ओसाका हिने परतीचे खोलवर फटके मारून या सेटमध्ये सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला व विजेतेपदावर नाव कोरले.

ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळविणे हे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. हे स्वप्न साकारल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मात्र सेरेनाकडून झालेल्या बेशिस्त वर्तनामुळे मला शानदार विजय साजरा करणे अयोग्य वाटत आहे. सेरेना ही खूप महान खेळाडू आहे.    – नाओमी ओसाका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button