breaking-newsक्रिडा

Ind vs Eng : आमचं नशीब! जडेजाला आधी संघात घेतलं नाही – इंग्लंड

भारताविरुद्धच्या अंतिम कसोटीत इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर दीडशेहून अधिक धावांची आघाडी मिळवली. पहिल्या दिवशी ७ बाद १९८ धावांवर असलेल्या इंग्लंडने दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३३२ धावांपर्यंत मजल मारली. मात्र अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या चार बळींमुळे भारताला इंग्लडला रोखण्यात यश आले. त्यानंतरही जडेजाच्या नाबाद ८९ धावांच्या फटकेबाजीमुळे भारताला तीनशे धावांच्या जवळ पोहोचता आले. त्याच्या या पराक्रमाबाबत इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक यांनी पॉल फ्रारब्रेस यांनी त्याचे कौतुक केले आणि खोचक शब्दात भारतीय संघ निवडीवर टीकाही केली.

जडेजा हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. पाचव्या कसोटीतील त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. मात्र इंग्लंडचे नशीबच म्हणावे लागेल की जडेजाला भारतीय संघाने केवळ शेवटच्या सामन्यात संधी दिली, अशा शब्दात फ्रारब्रेस यांनी मालिकेतील भारतीय संघ निवडीवर खोचक टीका केली.

जडेजा ८व्या क्रमांकावर खेळायला मैदानात उतरला आणि त्याने नाबाद ८९ धावा केल्या. ही खेळी उल्लेखनीय आहे. शेवटचा गडी बाद होण्याआधी जडेजाचा झेल इंग्लंडकडून सुटला. तेव्हा ते मनाला लागले. पण जडेजाला जीवदान मिळाले त्याचे वाईट वाटले नाही. कारण त्याने उत्तम खेळ केला होता, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button