breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेतील केंटुकीमधील मेगा स्टोअरमध्ये गोळीबार, दोघांचा मृत्यू

अमेरिकेतील केंटुकी येथील एका मेगा स्टोअरमध्ये हल्लेखोराने गोळीबार केल्याची घटना घडली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून गोळीबारात नेमके किती जण जखमी झाले आहेत ? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

केटुंगीतील जेफर्सन टाऊन येथे क्रोगर मेगा स्टोअरमध्ये बुधवारी दुपारी (अमेरिकेतील वेळेनुसार) एका हल्लेखोराने गोळीबार केला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचे वृत्त समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून मेगा स्टोअर आता सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हल्लेखोर कोण होता, त्याने गोळीबार का केला, याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नेमके किती जण या गोळीबारात जखमी झाले, याचा तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button