breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सॅनिटायझरच्या नावाखाली गुटख्याची तस्करी, आरोपीला कोरोनाची लागण

भिवंडी | तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत सॅनिटायझर वाहतूक करण्याच्या नावाखाली गुटका तस्करी करणाऱ्या कंटेनरला अन्न आणि औषध विभागाने 1 जून रोजी छापा टाकत सुमारे 37 लाखांचा गुटखा आणि 15 लाखांचा कंटेनर असा मुद्देमाल जप्त केला होता. या कार्यवाही दरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता अन्न व औषध विभागामध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे एफडीए विभागाच्या सात अधिकाऱ्यांनी कोरोना टेस्ट करून घेतली आहे. तसेच नारपोली पोलिस देखील घटनास्थळी असल्याने खळबळ उडाली आहे.

सदर घटनेमुळे अवैधरीत्या गुटखा विक्रीवर बंदी असताना मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात भिवंडी परिसरात अन्न आणि औषध विभागाने दोन मोठ्या कारवाया करून करोडो रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला. काही आरोपींना अटक देखील करण्यात आली होती. मात्र त्यापैकी एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने अन्न व औषध विभाग तसेच पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपीला अटक करून भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. तेथील अधिकारी कर्मचारी आणि अन्न औषध प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती, त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात येणार असून अन्न व औषध विभागाच्या 7 अधिकाऱ्यांचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यामुळे एकंदरीत पोलीस आणि एफडीए विभागात एकच खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button