breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी थोरात

पाच कार्याध्यक्षांचीही नियुक्ती; सहा निवडणूक समित्याही जाहीर

प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली.  प्रदेश काँग्रेसच्या समितीत थोरात यांच्या बरोबरीने नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन या पाच कार्यकारी अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली.

अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. प्रदेश काँग्रेसची संपूर्ण जबाबदारी एका व्यक्तीकडे सोपवण्यापेक्षा समाजातील विविध घटकांनाही निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यावर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार पाच कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत असल्याने विविध समित्यांही जाहीर झाल्या आहेत. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण तर समन्वय समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे असतील. निवडणूक समितीचे अध्यक्षपद बाळासाहेब थोरात तर प्रचार समिती नाना पटोले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती रत्नाकर महाजन यांच्याकडे असेल. माध्यम समितीचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा असतील.

जातीचे संतुलन

प्रदेशाध्यक्षपदी मराठा समाजातील बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करताना पक्षाने सर्व जातींना प्रतिनिधीत्व देऊन समतोल साधला आहे. नितीन राऊत (अनुसूचित जाती), यशोमती ठाकूर (इतर मागासवर्गीय), मुजफ्फर हुसेन (मुस्लीम), विश्वजीत कदम (मराठा), बसवराज पाटील (लिंगायत) समाजातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय आदिवासी समाजातील के. सी . पाडवी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button