breaking-newsराष्ट्रिय

सूर्यातून ‘ओम’ असा आवाज येतो…किरण बेदींनी पोस्ट केला व्हिडीओ…

नासाने सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला असून त्यातून ‘ओम’ असा आवाज येत असल्याचा व्हिडीओ पदुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी ट्विटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला जवळपास चार हजार लोकांनी रिट्विट केले असून अकरा हजारच्यावर लोकांनी लाईक्स केलं आहे. मात्र या व्हिडीओमुळे किरण बेदी यांना ट्रोल केलं जातं आहे. नासाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ओम’ असा येणारा आवाज हा फेक असल्याचं म्हटलं जात आहे.यावरुन अनेकांनी बेदी यांना कमेंट करुन त्यांना ट्रोल केलंय. एका युजरने नासाचा ओरिजनल व्हिडीओ पोस्ट करुन हे बघा, बाय नासा, असा उपहासात्मक टोला लगावला.

ताऱ्यांना जसा प्रकाश असतो, तसा त्यांचा आवाजही असतो. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने यावर संशोधन करुन सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला आहे. नासामधील सायन्स डिरेक्टर अलेक्झा यंग यांनी याविषयीचा व्हिडीओ त्यांच्या संकेतस्थळावर पोस्ट केला आहे. यामध्ये याची सविस्तर माहिती दिली आहे. माजी आयपीएस अधिकारी आणि पदुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी केलेल्या ट्विट केलेल्या व्हिडीओत आपली आकाशगंगा दिसत असून केंद्रस्थानी सूर्य आहे.

या व्हिडीओमुळे किरण बेदी यांना अनेकांनी ट्रोल केलं आहे. आम्ही तुम्हाला बुद्धीवान समजत होतो, मात्र, तुम्ही भ्रमनिरास केला, असं एका युजरने म्हटलं आहे. तर, अनेकांनी ऋतिक रोशनचा चित्रपट कोई मिल गयाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. माँ मेरी शक्तीओका गलत इस्तमाल किया…असंही मीम्स एकानं शेअर केलाय. काही युजर्सने त्यांचं समर्थनही केलं आहे. मात्र, अनेकांनी मजेशीर मीम्स शेअर करत त्यांना ट्रोल केलंय. एका युजरने नासाचा ओरिजनल व्हिडीओ पोस्ट करत नासा बाय…असा टोला लगावलाय.

नासाने सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला आहे. मात्र, यातून ओम सदृश्य कोणताही आवाज येत नसल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. सूर्यात हायड्रोज या वायुचे रुपांतर हेलियममध्ये होते. यावेळी प्रचंड प्रमाणात प्रकाश आणि उष्णता बाहेर पडते. आपला सूर्य हा वायुंचा गोळा आहे. त्यावर सातत्याने सौरवादळे होत असतात. परिणामी उच्च वारंवारतेच्या लहरी त्यातून बाहेर पडतात. मात्र, या लहरिंचा आवाज हा पूर्णतः वेगळा ऐकू येतो. त्यामुळे किरण बेदी यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button