breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुणवत्ता वाढीच्या नावाखाली शिक्षण समितीचा ‘टॅब’ खरेदीचा अट्टाहास

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीने एक अभिनव उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव आणला आहे. मनपाच्या 12 उपक्रमशिल शाळेतील इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना टॅब खरेदी करून देण्यासाठी समिती सभापती मनिषा पवार यांनी मान्यता दिली आहे.

वास्तविक पाहता 2002-3 मध्ये गौतम चाबुकस्वार उपमहापौर असताना मनपाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीकृत ज्ञान प्राप्त होण्यासाठी एका संस्थेची नेमणूक केली होती. संस्थेचे पथक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देत होते. शिवाय, मध्यंतरी बजाज कंपनीने मनपाच्या 50 शाळा संगणकीकृत ज्ञान वाढीसाठी चालविण्यास घेतल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या नावाखाली असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. संबंधीत संस्थांची बिले देखील मोकळ्या हातांनी काढण्यात आली. शेवटी विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली तर असे किती विद्यार्थी संगण साक्षर झाले, याचा आकडा शिक्षण प्रशासनाने समोर येऊन सांगावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांच्या पालकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

अधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांना गुणवत्ता वाढीची गरज

मनपाच्या शाळेची वाईट परिस्थिती असताना सदस्या चंदा राजू लोखंडे यांनी पालिकेच्या प्राथमिक विभागातील 12 उपक्रमशिल शाळांमधील इयत्ता पाचवी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी टॅब खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव 23 डिसेंबर 2019 रोजीच्या सभेत दुरूस्तीसाठी पाठविण्यात आला. आजच्या सभेत या प्रस्तावाला सभापती मनिषा पवार यांनी मान्यता दिली. हा प्रस्ताव खर्च मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे सातवी की आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी करायचे, याबाबत स्थायी समिती सदस्यांचा गोंधळ उडालेला दिसतोय. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षण प्रशासनातील अधिकारी, कर्मचा-यांबरोबरच सदस्यांना देखील गुणवत्ता वाढीची गरज असल्याची टिका विद्यार्थ्यांचे सुजान पालक करू लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button