breaking-newsपिंपरी / चिंचवड
सुलभा उबाळे यांच्या वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा, पिंपरी युवासेनेचा पुढाकार
पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी
कोरोनामुळे लोकांच्या मनात निर्माण झालेली चिंता लक्षात घेऊन शिवसेना नेत्या सुलभा उबाळे यांच्या वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला. पिंपरी युवासेनेकडून अकरा हजार रुपयांची मदत निलेश हाके यांनी दिली.
रकमेचा धनादेश सुलभा उबाळे ह्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी रामभाऊ उबाळे, युवासेनेचे कुणाल जनगाडे, किशोर शिंदे, प्रमोद गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचतगटाच्या शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदू काची यांनी केले होते.