पुणे

सुरक्षित प्रवासासाठी शॉपीकॅब आता पुण्यात सुरु

आजकाल दैनंदिन, वेगवान व सुरक्षित प्रवासाकरिता कॅबचे महत्व वाढले आहे. कोणत्याही समारंभासाठी किंवा व्यावसायिक कामा करीता लोग ऑनलाईन कॅब बुक करतात व इच्छित स्थळी पोहचतात. ही बाब लक्षात घेऊनच शॉपीकॅबने पुण्यात आपली सेवा सुरू केली आहे.

ग्राहकांना अग्रस्थानी ठेऊन शॉपीकॅब कार्यरत आहे. कमी भाडे, जास्त गाड्या, वेळेत उपलब्ध होणारी सेवा या मुळे शॉपीकॅब ग्राहकांच्या पसंतीस पडेल हे नक्की. शॉपीकॅब ची पुण्यात व कलकत्ता मध्ये ड्रायव्हर ऑन बोर्ड यावर आधीपासून सेवा सुरु आहे. शोपिझिओ ई-कॉमर्स या कंपनीने २ वर्षांच्या कालावधीत यशस्वीरित्या कलकत्ता शहरामध्ये या व्यवसायाला सुरुवात केली आणि आता पुण्यात त्याच उत्साहाने आणि हिरीरिने आपली कॅब सेवा सुरु केली आहे. शॉपिजिओ ई-कॉमर्स लिमिटेडने ६ मार्च १९९५ रोजी कलकत्ता येथे आपले कामकाज सुरू केले. शॉपिकॅबने कॅब सर्व्हिसेस, अ‍ॅग्रो कमोडिटी ट्रेडिंग फूड, टेली-शॉपिंग, फूड सप्लीमेंट प्रॉडक्ट्स, आयटी सर्व्हिसेस, डिजिटल मार्केटिंग, बीपीओ, इंटरनॅशनल स्टॉफिंग अ‍ॅण्ड इंटरनॅशनल स्टाफिंग आणि सहाय्यक ई- कॉमर्स मार्केट प्लेस इ सेवा पुरवितात.

शॉपिकॅबच्या कॅब सर्विसेस मध्ये ह्युंदाई आय२०, रेनो क्विड, डॅटसन गो, टोयोटा इनोवा, निसान सनी इ कारचा समावेश आहे.१९९५ पासून शॉपीझिओ सुरू झाल्यापासून आजपर्यंत ही “डेब्ट फ्री कंपनी” असल्याने शॉपीझिओ अभिमान बाळगतात आणि येत्या काही महिन्यांत बीएसई -एस एम इ मध्ये नोंदणी करण्याच्या तयारीत आहोत. शॉपिकॅबच्या यशाचा भाग होण्यासाठी कंपनी पीई / व्हीसी, एंजल इन्व्हेस्टर्स, एचएनआय, कार उत्पादक, विक्रेते, कायदा,सीए,सीएस,सीएमएफर्म्स, गुंतवणूक,बँकर्स, एफआयआय, एफडीआय, क्यूएस, क्यूआयबी, ब्रोकर, पोर्टफोलिओ व्यवस्थापक आणि सहयोगी यांना आमंत्रित करीत आहे. यावेळी बोलताना शॉपीकॅबचे व्यवस्थापकीय संचालक श्री चित्तरंजन रॉय म्हणाले की, “ आम्ही ही कंपनी ग्राहक आणि वाहन चालकांना अत्याधुनिक सेवा, सुरक्षित आणि सर्वाना परवडेल याच उद्देशाने सुरु केली आहे. ते पुढे म्हणाले की, वेळेच्या आधी आपले ध्येय साधायचे असेल तर व्हेंचर कॅपिटलिस्ट, एंजल इन्व्हेस्टर्स, कार मॅन्युफॅक्चरर्स, लॉ फर्म, गुंतवणूक बँकर्स या सर्वांचे आमच्या या प्रवासामध्ये स्वागत आहे.

शॉपीकॅबचे अँड्रॉइड व आयओएस डिव्हाइससाठी अॅपमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये उपलब्ध कॅबचे अचूक लोकेशन कळते व ग्राहक लगेच फोन करून आपली कॅब बुक करू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात ग्राहकांसाठी तणावविरहित प्रवास सेवा उपलब्ध नव्हती शॉपीकॅबमुळे राईड शेअर उद्योग नवी भरारी घेईल. शोपिझिओ ई- कॉमर्स यांनी गेल्या २५ वर्षात कलकत्ता मध्ये व आता पुण्यात स्वतःला ऑनलाईन कॅब बुकिंग मध्ये एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून सादर केले आहे. वेळेत सेवा, अनेक ऑफर्स सह स्वस्त सेवा तसेच वापरास सोपे अॅप ही शॉपीकॅबची प्रमुख वैशिष्टये आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button