पुणे जिल्ह्यातील ‘या’ सात तालुक्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
पुणे : राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एखदा लंम्पी रोगाचा फैलाव होत आहे. जिल्ह्यात बहुतांश गाई आणि म्हशींमध्ये लम्पी रोगाची लक्षणे दिसत आहेत. यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादक हैराण झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सात जिल्ह्यांतील जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली, पुरंदर आणि मुळशी तालुक्यात पाळीव गाई वर्णाय जनावरांमध्ये लम्पीचे संक्रमण होई लागले आहे. लम्पीचे संक्रमण रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जनावरांची वाहतुक, जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीत खरंच फूट पडलीय का? किती आमदारांचा पाठिंबा? अजित पवार म्हणाले..
तसेच पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात बैलगाडा शर्यतीवरही बंदी घालण्यात आल्याचं नमूद केलं आहे. सोबतच चाकण जनावरांचा बाजार ही बंद राहणार आहे. पशूसंवर्धन विभागाने लसीकरण मोहिमेवर जोर दिला आहे.