breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

येरवडा कारागृहाच्या पोलिस उपनिरीक्षकावर गोळीबार ; गुन्हे शाखेची पथके तपासासाठी रवाना

पुणे-   येरवडा कारागृहाबाहेर पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील यांच्यावर आज (शुक्रवारी) सकाळी सहा वाजता दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला . या गोळीबारातून तुरुंगाधिकारी पाटील सुदैवाने बचावले .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुरुंगाधिकारी पाटील हे नेहमीप्रमाणे त्यांच्या निवास स्थानावरून कर्तव्यावर जात असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.  तुरुंगाधिकारी पाटील पायी चालत सात असताना विश्रांतवाडीकडून येरवडा जेलच्या दिशेने येणा-या  दुचाकीवरील दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या जवळ असणाऱ्या छत्रीच्या सहाय्याने त्यांनी हल्लेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यातून तुरुंगाधिकारी पाटील बचावले. गोळीबार करून हल्लेखोर येरवड्याच्या दिशेने फरार झाले. घटनास्थळी पोलिसांनी गोळीबारानंतर एक पुंगळी हस्तगत केली आहे.
घटनेची माहिती तुरुंगाधिकारी पाटील यांनी तात्काळ येरवडा कारागृह प्रशासनाला दिली. त्यानंतर तातडीने येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकारात सुदैवाने तुरुंगाधिकारी पाटील यांना कोणतीही इजा झालेली नाही. कारागृह विभागाचे महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक पोलिस आयुक्त गणेश गावडे, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. तुरुंगाधिकारी पाटील यांची फिर्याद घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्या गोळीबाराच्या गंभीर घटनेच्या तपासासाठी येरवडा विश्रांतवाडी तसेच गुन्हे शाखेची पथके तपासासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. येरवडा कारागृहाबाहेर तुरुंगाधिकाऱ्यांवर गोळीबार करण्याच्या या घटनेमुळे येरवडा कारागृह पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button