breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली | दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंडमध्ये सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंडमधील लोअर मुंडा भागात सोमवारी सकाळी आठच्या सुमारास लष्कराच्या 19 आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली.

लोअर मुंडा भागात काही अतिरेक्यांची उपस्थिती असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने सकाळी 08 वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांचा शोध अधिक तीव्र केला असता, घेराव आणखी कठोर झाला तेव्हा लपलेल्या अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सैन्यानेही प्रत्युत्तर दिले. अनेक तास चाललेल्या या चकमकीत सैनिकांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button