breaking-newsपिंपरी / चिंचवड

सुमित ग्रुपकडून ई -वाहनांची लक्ष्यवेधी बाजारपेठ उपलब्ध

वाहन विक्रीवर दिला जाणार प्रोत्साहनपर भत्ता

पिंपरी|महाईन्यूज |प्रतिनिधी|

पेट्रोल व डिझेलच्या वारेमाप वापरामुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. हे प्रदूषण थांबविण्यासाठी केंद्र सरकारने 2030 पर्यंत देशातील 30 टक्के वाहने बॅटरी अर्थात विजेवरील असावीत, असा निश्चय केला आहे. या पार्श्वभूमीवर सुमितग्रुपने स्वदेशी इलेकट्रीक व्हेईकल लक्षवेधी बाजारपेठ उपलब्ध करून दिली असून प्रत्येक वाहन विक्रीसाठी पाच हजार रुपये विशेष प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा सुमित ग्रुपच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुमित ग्रुपच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर साळुंखे, टेक्नीकल विभागाचे संचालक मनोज चोपडे, शंकर सावंत, अजित धरंडले, वसंतराव पाटील, सुमीत साळुंखे आदी या वेळी उपस्थित होते.

देशात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहनांच्या प्रसारासाठी केंद्र सरकारने फेम ही योजना आणली आहे. फास्टर अडोप्शन ऑफ मनुफॅक्चरिंग ऑफ इ व्हेईकल असे त्याचे पूर्ण नाव आहे. विद्युत वाहनांमुळे जागतिक स्तरावर व देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थावरील अवलंबित्व कमी होईल. पर्यायाने कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. शिवाय पर्यावरणपूरक स्वस्त इंधन खर्च, वाहनांचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाचणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, 2030 पर्यंत संयुक्त राष्ट्र संघटनाही विद्युत वाहनाला उत्तेजन देणार आहेत. म्हणून केंद्र सरकारने 2030 पर्यंत इलेक्ट्रीक व्हेईकल नेशन घडविण्याचा निर्धार केला आहे. नॅशनल इलेक्ट्रीक मोबलीटी प्लॅन अंतर्गत केंद्र सरकारने 2020 पर्यंत 60 लाख इलेक्ट्रीक हायब्रीड वाहने रस्त्यावर उतरविण्याचा मानस ठेवला आहे. यासाठी सुमित ग्रुपने स्वदेशी इलेकट्रीक व्हेईकल लक्षवेधी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.

दरम्यान, सुमित ग्रुपच्या माध्यमातून दर्जेदार वाहनांची श्रेणी तयार केली असून ग्राहकांसाठी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. जास्तीत जास्त विद्युत वाहन वापर करणारे स्पर्धात्मक राज्य बनविण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धारेण जाहीर केले आहे. म्हणून विद्युत वाहनांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विजेवर चालणार्‍या वाहनांच्या उत्पादनाला वेग मिळेल व सार्वजनिक दळणवळणासाठी विजेवर चालणार्‍या वाहनांच्या उपयोगाला यामुळे प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुमित ग्रुपने वाहन विक्रीसाठी प्रोत्साहनपर अनेक योजना आणल्या असल्याचेही साळुंखे म्हणाले.

या इलेक्ट्रिक वाहनांची ठळक वैशिष्ठे म्हणजे, ग्राहकाला कोणत्याही लायसन्स परवान्याची गरज भासणार नाही. पीयुसी, आरटीओ टॅक्सची आवश्यकता नाही. विजेवर वाहन चालणार असल्याने फिरते भाजी व्यावसायिक, माल वाहतूक, फिरते फळविक्री, ज्यूससेंटर सारख्या व्यवसायासाठी ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.

बाजारपेठेची गरज आणि केंद्र व राज्य शासनाचे धोरण विचारात घेऊन सुमित ग्रुपने स्वदेशी इलेक्ट्रीक व्हेईकल प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून प्रवासी व व्यवसायिक वाहनांची श्रृंखला बाजारपेठेत दाखल केली आहेत. जागतिक दर्जाची वाहने बनविताना भारतीय बाजारपेठेच्या गरजा, रस्त्यांचा दर्जा याबाबींचा खास अभ्यास करून निर्मिती केल्याचेही साळुंखे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button