breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

रिलायन्स जिओने फाइव्हजी तंत्रज्ञान-डिझाइन विकसित ; चाचणीची परवानगी मागितली

दिल्ली | सरकार भलेही फाइव्हजी स्पेक्ट्रमचा लिलाव करू शकत नसले तरी आता या तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी प्रथमच भारतीय दूरसंचार कंपनीने रस दाखवला आहे. रिलायन्स जिओने फाइव्हजीच्या चाचणीसाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे.

त्यासाठी त्यांनी स्वत:चे तंत्रज्ञान आणि डिझाइन विकसित केले आहे. सूत्रांनुसार, ही चाचणी यशस्वी झाल्यास उपकरणांचे डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगचे काम अन्य कंपन्यांद्वारे केले जाऊ शकते. यासाठी कंपनीने सॅमसंगसोबत चीनच्या दिग्गज कंपन्या हुआवे टेक्नॉलॉजीज, एरिक्सन तसेच नोकिया नेटवर्क्सनाही समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कंपनी सॅमसंगवर विश्वास ठेवत होती. सॅमसंग जिओच्या ४ जी सेवांसाठी उपकरणांचा पुरवठा करत आहे.

सॅमसंगलाही चिनी कंपन्यांच्या आक्रमक बोली आणि कडव्या स्पर्धेनंतर संधी मिळत होती. रिलायन्स जिओच्या एका प्रवक्त्याने यासंदर्भात टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. रिलायन्सचे हे पाऊल महत्त्वाचे आहे. कारण दूरसंचार उपकरण डिझाइन, निर्मितीत विदेशी कंपन्यांचा दबदबा आहे.

सरकारही दूरसंचार उपकरणांचे डिझाइन आणि निर्मितीत स्थानिक स्तरावर क्षमता विकसित करण्यावर जोर देत आहे. २०१८ मध्ये ट्रायने स्थानिक उपकरण निर्माता कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सल्ला दिला होता.रिलायन्स गेल्या काही दिवसांपासून काहीही गाजावाजा न करता रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिझाइन व टेक्नॉलॉजी क्षमता विकसित करत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजची सहयोगी कंपनी रॅनकोर टेक्नॉलॉजी कोअर सॉफ्टवेअरच्या विकासावर काम करत हाेती. आयओटीच्या क्षेत्रात रिलायन्स जिओची क्षमता वाढवण्यासाठी रिलायन्सने २०१८ मध्ये अमेरिकी कंपनी रेडिसिसला ६.७ कोटी डॉलरमध्ये खरेदी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button