breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुबोध भावे निर्मित ‘शुभमंगल ऑनलाईन’ २८ सप्टेंबरपासून कलर्स मराठीवर सुरू होणार

मुंबई – सध्या लग्न जमवण्याचं काम डिजिटल विश्व करत आहे. विविध सोशल मीडिया अॅप आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपद्वारे लग्न जुळवण्याचं काम सुरू आहे. पण लग्नच ऑनलाईन लागलं तर? अशीच एक भन्नाट गोष्ट कलर्स मराठी आणि निर्माता सुबोध भावे घेऊन आले आहेत.

या मालिकेतील मुख्य नायक आणि नायिका शंतनू आणि शर्वरीचा हा ऑनलाईन लग्न सोहळा कसा पार पडेल ? काय गंमती जमती होतील ? हे बघण्यासाठी तुम्ही देखील सहभागी व्हा या न्यू नॉर्मल, आगळया वेगळ्या लगीनघाईमध्ये… सुबोध भावे (कान्हाज् मॅजिक) निर्मित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित ‘शुभमंगल ऑनलाईन’ २८ सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर सुरू होणार आहे यामध्ये सुकन्या कुलकर्णी – मोने, अमिता खोपकर, सायली संजीव, सुयश टिळक, आनंद इंगळे, मिलिंद फाटक, अंकिता पनवेलकर प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

मालिकेबद्दल बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजन, वायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, ‘टेलिव्हिजन माध्यम काळासोबत नवं रूप, आकार घेत असतं. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन, नवनवे कार्यक्रम देणे आमचे उद्दिष्ट आहे आणि दर्जेदार कार्यक्रम ही कलर्स मराठीची परंपराच आहे… सद्यस्थिती बघता आपल्या सगळ्यांनाच रिफ्रेशिंग, कलरफुल, युथफुल आणि सकारात्मक दृष्टिकोन देणार्‍या गोष्टी बघण्याची नितांत आवश्यकता आहे… ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेद्वारे आम्ही सद्यस्थिति दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत… डिजिटल माध्यमांचे महत्व आणि त्यावर नाही म्हटलं तर आजची तरुण पिढी काय आपण देखील काहीना काही कारणास्तव अवलंबून आहोत… जेव्हा लग्नासारखी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट ऑनलाईन माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा काय घडतं हे बघणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असणार आहे… मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच हा विषय कलर्स मराठीद्वारे दाखवला जाणार आहे.

कार्यक्रमाविषयी बोलताना मालिकेचे निर्माते सुबोध भावे म्हणाले, ‘माणूस एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमीच वेगवेगळी माध्यमं शोधून काढतो, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष. प्रेम करणाऱ्या शर्वरी आणि शंतनू यांनीही असंच प्रेमाचं वेगळं माध्यम शोधून काढलं आहे, त्याचीच ही गोष्ट ! याआधी बरेचसे ग्राऊंड एवेंट्स प्रोड्यूस केले, सिनेमा केला ‘पुष्पक विमान’ नावाचा पण मालिका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनेक दिवस मालिकेची निर्मिती करावी अशी ईच्छा होती पण हवीतशी स्क्रिप्ट मिळत नव्हती… लॉकडाऊनच्या काळात शुभमंगल ऑनलाईन या मालिकेची गोष्ट आली, जी आम्हां सगळ्यांना आवडली आणि ती आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे २८ सप्टेंबरपासून कलर्स मराठीवर. चांगली टिम जमली आहे दिग्दर्शक, कलाकार आणि पडद्यामागची टिम त्यामुळे उत्सुकता आहे. प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी उचललेले पाऊल आता त्यांच्यापर्यंत पोहचणार आहे… कलर्स मराठी आणि कान्हाज् मॅजिकचा हा प्रयोग रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button