breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

उमर खालिदला दिल्ली दंगलप्रकरणी २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली – दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या उमर खालिदला आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित रावत यांच्यासमोर हजर करण्यात आलं. यावेळी न्यायाधीशांकडून त्याला २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात जातीय हिंसाचार हा कथितरित्या खालिद आणि इतर दोन जणांनी केलेला पूर्वनियोजित कट असल्याचा दावा करण्यात आला आहे. खालिदविरोधात देशद्रोह, खून, खुनाचा प्रयत्न, धर्माच्या आधारे समाजात द्वेष भडकावणारे आणि दंगल भडकवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालिदनं दोन वेगवेगळ्या ठिकाणी भडकाऊ भाषणे केली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचे आवाहन केले. तसेच भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवण्याचा यामागील उद्देश होता. हा कट रचण्यासाठी अनेक घरांमध्ये हत्यारं, पेट्रोल बॉम्ब, अ‍ॅसिड बाटल्या आणि दगड ठेवण्यात आले होते, असेही प्राथमिक माहिती अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button