breaking-newsमनोरंजन

सुप्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली

मुंबई – सुप्रसिद्ध गायक एस.पी.सुब्रमण्यम यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना आता अतिदक्षता विभागात हालवण्यात आलं असून, डॉक्टर्स त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

९० च्या दशकात सलमान खान याचा आवाज म्हणून एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्याकडे पाहिलं जायचं. हम से है मुकाबला या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला आहे. एलया राजा, ए.आर. रेहमान, नदीम-श्रवण, जतीन ललीत आदी अनेक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं आहे. हिंदीसह तमीळ, तेलुगु, मल्याळम आदी भाषांत 40 हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.

५ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांना तातडीने चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत होते. अचानक गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी आयसीयूत हालवण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button