breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे-पिंपरी-चिंचवडकरांनो सतर्क रहा : आगामी तीन दिवसांमध्ये उन्हाचा चटका वाढणार!

हवामान खात्याचा अंदाज : राज्यातील बहुतांश शहरांमधील पारा वाढला

पुणे : शहरात महाशिवरात्रीनंतर उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली आहे. कमाल तापमानाने रविवारी (दि.१०) ३६.९ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली. किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४.८ अंश सेल्सिअस नोंदवले. पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात अंशतः वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या सोमवारी (दि.४) कमाल तापमानाचा पारा ३३.६ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला होता. तो आठवड्याभरात प्रत्येक दिवशी वाढत गेला. आठवड्याभरात किमान तापमान ३.३ अंश सेल्सिअसने वाढले.

हेही वाचा –‘ईडिकडून केवळ विरोधी नेत्यांची चौकशी’; शरद पवारांची टीका 

शहरात कोरेगाव पार्क भागात सर्वाधिक म्हणजे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.पुणे, चिंचवड, लोहगाव, चिंचवड, मगरपट्टा, एनडीए येथे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शहरातील सर्वांत कमी कमाल तापमानाची नोंद पाषाण येथे ३६ अंश सेल्सिअस झाली.

राज्यातील बहुतांश शहरांमधील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राज्यात सोलापुरात सर्वाधिक म्हणजे ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाच्या पाऱ्याने ३७ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याचेही हवामान खात्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button