breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपावर विद्या चव्हाणांच्या सुनेनं दिलं उत्तर

“मुलगा हवा म्हणून कुटुंबीयांनी आपला छळ केला. मला पहिली मुलगी होती, त्यानंतर दुसरीही मुलगी झाली. त्यानंतर कुटुंबीयांकडून अधिक छळ करण्यात आला,” असा दावा विद्या चव्हाण यांच्या सुनेकडून करण्यात आला आहे. मंगळवारी विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत आपल्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मुलाला मिळाली असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या सुनेची प्रतिक्रिया समोर आली आहे.

“आपले विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप हा खोटा आहे. जेव्हा मी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्यावेळी कुटुंबीयांनी माझ्याविरोधात पुरावे गोळा करून बदनाम करण्याची धमकी दिली होती. त्यांना आता तेच केलं आणि माझ्याविरोधात कट रचला,” असा दावा त्यांनी केला.

“आपल्याला मुलगा झाला नाही म्हणून कुटुंबीयांकडून छळ करण्यात आला. माझ्या दीरानंही माझा मानसिक छळ केला. अशा गोष्टींबाबत मी आता गप्प बसणार नाही हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी मला घराबाहेर काढलं. तसंच लहान मुलीपासूनही मला वेगळं केलं आहे. जेव्हा मी त्या घरात राहू देण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या वडिलांना मारून घराबाहेर काढलं. त्यानंतर मी पोलीस स्थानकात जाऊन त्यांच्याविरोधात तक्रार केली,” अशी माहिती त्यांच्या सुनेनं दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

“मी १६ जानेवारी रोजी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यानंतर २२ जानेवारी रोजी डिवी केस दाखल केली. स्वत:वरील आरोप मागे घेण्यासाठी ते माझ्या मुलीचाही वापर करत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला आहे. “सध्या मला कौटुंबीक न्यायालयानं मुलीला १ ते ६ दरम्यान भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यापूर्वी मला तिच्याशी फोनवरही बोलू दिलं जात नव्हतं. ज्या व्यक्ती महिलांच्या प्रश्नांसाठी लढतात त्यांनीच माझ्यावर असा अन्याय केला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button