breaking-newsमहाराष्ट्र

एकतर्फी प्रेमातून कॉलेजमध्ये घुसून प्राध्यापिकेला लावले कुंकू

नाशिक : एकाच महाविद्यालयात शिक्षण घेणा-या परंतु आठ वर्षापासून एकतर्फी प्रेम करणा-या एका प्रेमवेड्याने कॉलेजमध्ये घुसून एका प्राध्यापिकेला जबरदस्तीने कुंकू लावत लग्नाची मागणी घातली.

नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या या युवतीवर योगेश रमेश जावळे याचे एकतर्फी प्रेम होते. त्याने चक्क कॉलेजमध्ये घुसून संबंधित प्राध्यापिकेला ‘मला आता नोकरी लागली आहे, आता तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत तिच्याकडे लग्नाची मागणी घातली आणि कुंकू लावण्याचा प्रयत्न केला.

योगेश रमेश जावळे आणि संबंधित प्राध्यापिका हे होघेही आठ वर्षापूर्वी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तेव्हापासूनच योगेश हा पीडितेवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, त्याने कधी प्रेम व्यक्त केले नव्हते. त्यामुळे पीडिताही त्याच्या सोबत मित्रा प्रमाणे बोलत होती. परंतु डिसेंबरमध्ये योगेशने या प्राध्यापिकेला लग्नाची मागणी घातली. त्यावेळी तिने त्याला स्पष्ट नकार दिला. मात्र तरीही त्याने पीडितेकडे लग्न करण्यासाठी तगादा सुरूच ठेवला होता. मात्र पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले.

काल सकाळी योगेशने कॉलेजमध्ये घुसून तिचा हात पकडून ‘मला आता नोकरी लागली आहे. आता तू माझ्या सोबत लग्न कर, असे म्हणत खिशातून कुंकवाची पुडी काढून पीडितेला जबरदस्तीने कुंकू लावण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयातील इतर प्राध्यापकांना वेळीच ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी योगेशला अडवले. तेव्हा त्याने कॉलेजमधील शिपाई व इतरांनाही धक्काबुक्की केली. मात्र, त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पीडितेने सरकारवाडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी योगेश जावळेला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेशला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button