breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

सुंदर आणि उजळ त्वचेसाठी कापूर आहे खूप महत्त्वाचा

सुंदर आणि उजळ त्वचेसाठी घरगुती उपाय हे सर्वांत रामबान मानले जातात. त्यात फळे किंवा फळांच्या साली आपण वापरतो..एवढचं नाही तर आपण जेवन बनवताना वापरणाऱ्या अनेक मसाल्यांचाही उपयोग हा फेसपॅकसाठी किंवा बॉडी व्हाईटनिंगसाठी वापरतो. पण आज आपण पुजेसाठी वापरात आणत असलेला कापूर आपली त्वचा सुंदर, नितळ आणि डाग विरहीत होण्यास कसा मदत करतो ते पाहुया… होय, कापरामध्ये असे अनेक गुणधर्म आढऴून येतात ते आपल्या त्वचेच्या अनेक तक्रारी दूर करण्यास मदत करतात. तर पाहुुुुुुुुयात की कापूर मिक्स करून आपण फेसपॅक कसा तयार करायचा ते.

योग्य प्रमाणात कापूरचा वापर केल्यास चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुम आणि पुरळचा त्रास देखील कमी होतो. कापूरमध्ये अँटी बॅक्‍टेरियल चे गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्वचेवर होणारी जळजळ, रॅशेज आणि खाज सुटण्याचा त्रास कमी होतो. मुलतानी माती आणि कापूर यांना एकत्र करून हा फेसपॅक तयार करायचा आहे. झोपण्यापूर्वी हे मास्क लावला तरी चालेन..तर हा फेसपॅक कसा तयार करायचा ते पाहुया.

  • दोन मोठे चमचे मुलतानी माती
  • अर्धा चमचा कापूर किंवा कापूरचे तेल
  • एक मोठा चमचा गुलाब पाणी 
  • एका वाटीमध्ये सर्व सामग्री एकत्र घ्या आणि जाडसर फेस मास्क तयार करा.
  • मास्क लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
  • यानंतर ही पेस्ट चेहरा, मान आणि हाता-पायांनाही लावा.
  • १५ मिनिटांनंतर चेहरा, हात, पाय थंड पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्या.
  • जर त्वचा कोरडी असल्यास गुलाब पाण्याऐवजी तुम्ही नारळाचे तेल किंवा मधाचा वापर करू शकता.

केवळ कापूरच नाही तर कापराच्या तेलामुळेही त्वचेला भरपूर प्रमाणात फायदे होतात.आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये कापूरचा समावेश करावा. नियमित कापूरचा वापर केल्यास डागांची समस्या कमी होईल. त्वचेसोबतच केसांना देखील कापूर तेलाचा फायदा होतो. या तेलामुळे केस मजबूत आणि घनदाट होतात. कापूरमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत, यामुळे त्वचेशी संबंधित कित्येक समस्या दूर होण्यास मदत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button