breaking-newsराष्ट्रिय

सीमीचे अठरा जण दोषी; 17 जणांची निर्दोष सुटका

कोची – घातपाती कारवायांसांठी प्रशिक्षण केंद्र चालवल्याच्या आरोपावरून विशेष एनआयए न्यायालयाने सीमी या बंदी घातलेल्या संघटनेतील अठरा जणांना दोषी ठरवले असून या प्रकरणातील अन्य सतरा जणांची मात्र निर्दोष सुटका करण्यात आली आहे. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा आणि स्फोटक कायदा तसेच भारतीय पीनल कोडच्या विविध कलमांखाली त्यांच्यावर हे आरोपपत्र ठेवण्यात आले होते.

दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींची शिक्षा उद्या जाहींर केली जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयएने या प्रकरणाचा तपास करून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणाऱ्यांची सारी पाळेमुळे खणून काढली होती. यातील आरोपी हे सीमी म्हणजेच स्टुडंट इस्लामिक संघटनेचे सदस्य होते. या संघटनेवर देशात या आधीच बंदी घालण्यात आली आहे पण या आरोपींनी गुप्तपणे संघटनेच्या कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.

केरळातील तंगलपारा येथे त्यांनी घातपाती कारवायांसाठी हे प्रशिक्षण केंद्र उघडले होते. तसेच या आरोपींनी मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात इत्यादी ठिकाणीही अशी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली होती. या केंद्रांवर संशयीतांना बंदुका चालवणे, स्फोट घडवून घातपाती कारवाया करणे इत्यादींचे प्रशिक्षण दिले जात असे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button