सीबीएससीच्या १० आणि १२ वीच्या परीक्षा रद्द, नवीन तारखा होणार जाहीर
नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या १० वी आणि १२ बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सरकारने गुरूवारी सुप्रीम कोर्टात सांगितले की एक जुलै ते १५ जुलै या दरम्यान प्रस्तावित बोर्डाच्या परीक्षा आता नाही होणार आहेत. सरकारने हे देखील सांगितले की आगामी काळात या संदर्भात तारखा ठरविण्यात येणार आहेत. सरकारने १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना पर्याय दिला आहे.
देशात कोरोना संकटामुळे सरकारने या परीक्षा पुढे ढकलेल्या आहेत. या संदर्भात विद्यार्थ्यांनाही वाटत होतै की आता परीक्षा स्थगित करण्यात याव्यात. आता त्यामुळे बोर्डाने या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी झाली. यात सीबीएसई बोर्डाने आपली बाजू मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी महाराष्ट्र, दिल्ली आणि ओडिशा या राज्यांनी या परीक्षा रद्द करण्याचा आग्रह केला होता.