breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल अखेर जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल १५ जुलै पर्यंत लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती…मात्र बोर्डाने सुप्रीम कोर्टाला २६ जून रोजी सांगितल्यानुसार १५ जुलैच्या आधी निकाल जाहीर करण्यात आला आहे.

१) निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत वेबसाइट cbseresult.nic.in वर पाहता येणार आहे.
२) वेबसाइटवर दिलेल्या दहावी आणि बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

३) आपला रोल नंबर टाका
४) आता तुम्ही तुमचा निकाल पाहू शकाल.
५) भविष्यातील माहिती वा अन्य कामकाजासाठी निकालाची प्रिंटही घेऊ शकाल.

ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे त्यांचा निकाल सामान्य पद्धतीने जाहीर होईल. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी तीनहून अधिक पेपर दिले आहे, त्यांचा उर्वरित विषयांचे गुण हे त्यांनी दिलेल्या पेपरपैकी सर्वोत्तम तीन विषयांच्या सरासरीएवढे असतील. ज्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत तीन पेपर दिले आहेत, त्यांना उर्वरित विषयांसाठी सर्वोत्तम दोन विषयांच्या सरासरीएवढे गुण मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना एक किंवा दोन विषयांचीच परीक्षा दिली आहे, त्यांचा निकाल बोर्डातील कामगिरी आणि अंतर्गत मूल्यमापन, प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण आदींच्या आधारे लावला जाणार आहे.

बारावीचे विद्यार्थी कोविड १९ परिस्थिती सामान्य झाल्यावर श्रेणीसुधार परीक्षा देऊ शकणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय लागू नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button