breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी माई काटे, तर उपमहापौर पदासाठी राजू बनसोडे यांचा अर्ज दाखल

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नगरसेविका माई काटे यांनी अर्ज दाखल केला. तसेच, उपमहापौर पदासाठी नगरसेवक राजू बनसोडे यांनी अर्ज भरला आहे.

          पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने सोमवारी महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी सर्वानुमते अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेता विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक भाउसाहेब भोईर, जावेद शेख, वैशाली काळभोर आदी उपस्थित होते.

  दरम्यान, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून अद्याप कोणीही अर्ज दाखल  केलेला नाही. अखेरच्या क्षणी महापौर आणि उपमहापौरपदसाठी कुणाची वर्णी लागणार? याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

***

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button