breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

शुटींग दरम्यान पार्थ समथान याला कोरोनाची लागण; ट्विटरवरून दिली माहिती

आता मालिका आणि चित्रपटांच्या शुटींगला परवानगी देण्यात आली. तेव्हापासून बऱ्याच कलाकारांना शुटींगदरम्यान कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक घटना घडल्या त्यात आता कसौटी जिंदगी की’ या प्रसिद्ध मालिकेत अनुराग बासूची भूमिका साकरणारा अभिनेता पार्थ समथान याला कोरोनाची लागण झाली आहे . याबाबत पार्थने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे.

“माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी विनंती करतो की, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी. सध्या मी सेल्फ क्वारंटाईन आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या संपर्कातदेखील आहे. सर्वांच्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. कृपया सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी”, असं पार्थ ट्विटरवर म्हणाला

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन काळात मालिकांच्या चित्रिकरणासाठी परवानगी दिली. तेव्हापासून ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेचं चित्रिकरण सुरु करण्यात आलं. मात्र, पार्थचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या मालिकेचं चित्रिकरण पुन्हा बंद पडलं आहे. पार्थच्या सहकलाकारांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे.

दरम्यान, ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेची निर्माता कंपनी ‘बालाजी टेलिफिल्म्स’ने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही चाहत्यांना सांगू इच्छितो की, मालिकेत एका कलाकाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सर्व टीमच्या तब्येतीची काळजी घेणं, ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. आम्ही सरकारच्या सर्व नियमांचे पालन करत आहोत”, असं ‘बालाजी टेलिफिल्म्स’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button