breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

सीएए, एनआरसी आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक…

सीएए, एनआरसी आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज म्हणजेच 29 जानेवारीला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.तसेच, देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं आहे. या भारत बंदला शाहीन बागमधील आंदोलक महिलांनाही पाठिंबा दिला आहे.

आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. याशिवाय संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला एनआरसी-सीएएचा विरोध करणाऱ्या इतर संघटनांचाही पाठिंबा मिळू शकतो.


सततच्या बंदचा परिणाम आता थेट व्यापाऱ्यांवर दिसू लागला आहे. 29 जानेवारी रोजी असलेला भारत बंद आम्ही पाळणार नाहीत, असं निवेदन परळी शहर व्यापारी महासंघाने प्रशासनाला दिलं आहे. सरकारविरोधात असलेल्या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनता आणि व्यापार्‍याला भोगावा लागतो. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक हानी होत आहे. 2019 मध्ये जवळजवळ वीस एक वेळा व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत, असं निवेदनात म्हटले आहे.
अशाप्रकारे आजच्या भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली तर मुंबईत काही ठिकाणी रेल रोको करण्यात आली…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button