breaking-newsताज्या घडामोडी

नाशिकच्या बस-रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा 26 वर… मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत…

नाशिक | महाईन्यूज |

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात झालेल्या बस आणि रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा 26 वर गेला आहे तर 33 जण जखमी आहेत. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. अपघातातील जखमींवर सध्या मालेगावातील जिल्हा रुग्णालयासह इतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर रिक्षामधील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत केली जाईल असं आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

नाशिकमधील एसटी आणि ऑटो रिक्षाच्या अपघातानंतर विहिरीत पडलेल्या बाळाचा मृतदेहच अखेर हाती आला. एनडीआरएफच्या पथकाने केलेली 18 तासांच्या प्रयत्नांची शिकस्त अखेर व्यर्थ ठरली. एसटी-रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा 26 वर पोहचला आहे.

अपघातग्रस्त एसटीमधील लहान बाळ विहिरीत अडकल्याची माहिती बचाव पथकाला देण्यात आली होती. त्यानुसार अपघाताच्या दिवशी म्हणजे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरु होतं. मात्र अंधारामुळे अडथळे आल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती.एनडीआरएफच्या जवानांनी आज सकाळीच बचावकार्याला पुन्हा सुरुवात केली, मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. एसटीमध्ये अडकलेल्या बाळाला बाहेर काढलं, तोवर त्याचा श्वास बंद झाला होता. मालेगाव-देवळा रोडवरील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button