breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सिल्वर लेकची रिलायन्स रिटेलमध्ये आणखी १,८७५ कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली – अमेरिकेतील खासगी इक्विटी कंपनी सिल्वर लेक रिलायन्स रिटेलमध्ये आणखी १,८७५ कोटींची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने दिली आहे. त्यामुळे सिल्वर लेक आणि तिच्या सह-कंपनीची रिलायन्स रिटेलमधील एकंदर गुंतवणूक ९,३७५ कोटी इतकी होणार आहे. म्हणजे त्यांची भागीदारी २.१३ टक्के एवढी वाढणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स रिटेलमध्ये बुधवारी ३० सप्टेंबरला एकाच दिवशी दोन कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ४ आठवड्यांत या कंपनीत एकूण ४ कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या पत्रात रिलायन्स रिटेलमध्ये ४,२८५ कोटींची दोन कंपन्यांनी गुंतवणूक केली असल्याची माहिती दिली आहे. भारतीय ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासंदर्भात रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक आणि त्यांच्या सहकंपनीने गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आमचा विश्वास आणखी वाढला असून आम्हाला आधार मिळाल्याने आनंद वाटतो, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले.

रिलायन्स रिटेल गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक जमा करत आहे. त्यात आतापर्यंत त्यांनी १३ हजार ५० कोटी जमा केले आहेत. त्यानंतर आता सिल्वर लेकने पुन्हा १,८७५ कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सिल्वर लेकची रिलायन्स रिटेलमधील भागीदारी १.७५ वरून २.१३ टक्के झाली आहे. अमेरिकेतील केकेआरची रिलायन्स रिटेलमध्ये १.२८ टक्के तर जनरल अटलांटिकची ०.८४ टक्के भागीदारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button