breaking-newsराष्ट्रिय

सिमल्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई – मदतीसाठी लष्कराला पाचारण

सिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलापुढे पाण्याच्या भीषण टंचाईचे संकट उभे आहे. या परिस्थितीर मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी लष्कराचे टॅंकर्स बोलावण्यात आले आहेत. अंबाला आणि पतियाळा येथून हे टॅंकर्स सिमल्यात पोहचले आहेत. लष्कराचे जवान सिमल्याच्या विविध भागांना टॅंकर्सनी पिण्याचे पाणी पुरवत आहेत.

लष्करी जवानांप्रमाणेच स्थानिक नगरसेवकही नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी झटत आहेत. पाण्यची टंचाई लक्षात घेऊन सरकारी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि पर्यटकांना सिमल्यात न येण्याचे आवाहन करण्यात अले आहे.

25,000 वस्तीसाठी वसवण्यात आलेल्या सिमलाची आजची लोकसंख्या 1 लाख 72 हजार झालेली आहे. आणि येणाऱ्या पर्यटकांची संख्या 1 लाखावर गेली आहे. त्यामुळे रोजची पाण्यची मागणी 45 एमएलडी म्हणजे दहा लाख लिटर्सने वाढते. पाण्याच्या टंचाईमागचे हे एक मोठे कारण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button