breaking-newsमहाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हाच सीसीटीव्हीच्या निगराणीत

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आली आहेत. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे पोलिसांना सहज शक्य होणार आहे. अशाप्रकारे संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आलेला हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

सिंधुदुर्गमधील सीसीटीव्ही सनियंत्रण योजनेचे ऑनलाईन उद्घाटन काल अनिल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, आमदार दीपक केसरकर आणि आमदार नितेश राणे हेही उपस्थित होते. जिल्ह्याच्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गसाठी चांगली कामे केली आहेत. या संपूर्ण जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विणले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात आणि गुन्हेगारी कमी करण्यात यामुळे मदत मिळणार असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button