breaking-newsराष्ट्रिय

‘वाईफ स्वॅपिंग’ला नकार दिल्याने पत्नीची हत्या

वाईफ स्वॅपिंग अर्थात पत्नींची अदलाबदली करण्यास नकार देण्याऱ्या महिलेचा तिच्या पतीने आणि त्याच्या साडूने या महिलेची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. ज्या महिलेची हत्या झाली तिच्या नवऱ्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्याने ही घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण तिघांना अटक केली.

ज्या महिलेची हत्या झाली ती महिला तिच्या पतीला आवडत नव्हती. त्याला तिची बहिण आवडली होती. तिच्या बहिणीचेही लग्न झाले होते. तिच्या बहिणीच्या नवऱ्यालाही त्याची पत्नी आवडत नव्हती तर मृत महिला आवडत होती. त्यामुळे या दोन्ही साडूंनी मिळून वाईफ स्वॅपिंगची योजना आखली आणि ती त्यांच्या पत्नींना सांगितली. या योजनेला मृत महिलेच्या बहिणीने वाईफ स्वॅपिंगला होकार दिला तर तिने मात्र या प्रकाराला नकार दिला. एवढंच नाही तर अशी किळसवाणी योजना आखण्याऱ्या पतीला तिने थोबाडीतही ठेवून दिली. मृत महिलेचे नाव लक्ष्मी होते. या प्रकारानंतर लक्ष्मीच्या नवऱ्याच्या तिच्या हत्येचा कट रचला.

३० नोव्हेंबरला लक्ष्मीच्या नवऱ्याने तिची हत्या केली. लक्ष्मीचा मृतदेह त्याने तिच्या माहेरच्या घरापासून १०० मीटर अंतरावर फेकला. पोलिसांनी याप्रकरणी लक्ष्मीचा पती विशाल, त्याचा साडू आणि आणखी एकाला अटक केली आहे. विशालचे त्याच्या बायकोवर मुळीच प्रेम नव्हते. विशालला लक्ष्मीची बहिण आवडत होती आणि लक्ष्मीच्या बहिणीच्या नवऱ्याला लक्ष्मी आवडत होती. त्यामुळे या दोघांनी मिळून वाईफ स्वॅपिंगची योजना तयार केली. या योजनेला लक्ष्मीने नकार दिला. तेसच विशालला थोबाडीतही ठेवून दिली. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी विशाल त्याचा साडू योगेंद्र आणि आणखी एकाने मिळून लक्ष्मीची हत्या केली. आता या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मी या सगळ्या प्रकारानंतर माहेरी गेली होती. तिथे गेल्यानंतर विशालने तिला फोन केला आणि तिला भेटीसाठी घराबाहेर बोलावले. त्यावेळी विशालचा साडू आणि आणखी एक साथीदार तिथे पोहचलेच होते. या तिघांनी लक्ष्मीचा गळा दाबून खून केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button