breaking-newsपिंपरी / चिंचवड

सिंगापूर स्मार्ट सिटी शिष्टमंडळाची महापालिकेला भेट

पिंपरी ( महा ई न्यूज ) – सिंगापूर स्मार्ट सिटीच्या शिष्टमंडळांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट देऊन महानगरपालिकेच्या कामांची माहिती घेतली. महापौर राहुल जाधव यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण होते.

या शिष्टमंडळामध्ये एनवायरसेन्स लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शैलेश खरकवाल, एन्वरकॉम युनिटेक सिंगापूर प्रा.लि. चे संचालक टी.एस. वेलान, आयटी रिसर्च हेड लि मिंग होंग, ग्रेम्याटिक्स प्रा. लि. च्या संचालिका रचिता कुमार, एचव्हीएस इंजिनिरिंग लि. चे कार्यकारी संचालक अलेक्स चॉऊ, मास्टॉ्न प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी संचालक बेंजामिन ओंग, नेक्सटान प्रा.लि. चे मुख्य विकास अधिकारी विल्फ्रेड टान, स्कायलॅब नेटवर्क्स प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन हो, स्मार्ट क्लीन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लाव आगरवाल, स्पेस एज लॅब्स प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक पिट्टा, एक्ससीएम सिक्युरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन लेऑ, एक्सेलपॉंट सिस्टिम्स प्रा.लि. चे परविंदर सिंग भासिन, सेंटर ऑफ इनोवेशन फॉर इलेक्ट्रोनिक्सचे बिजनेस सेंटर व्यवस्थापक जॉन फंग, व्यवस्थापक अॅलन फुंआ, सीरिअल मायक्रोइलेक्ट्रोनिक्सचे अतुल भाकाय, एंटरप्रायज सिंगापूर चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एडविन चॉव, प्रादेशिक व्यवस्थापक केंग फंग गो, साउथ इंडिया एंड एचक्यू एंटरप्रायजेसचे केनी ओंग, इलेक्ट्रॉनिक्स/रोबोटिक्स मटेरीएल प्रोसेस सिंगापूरचे वालारी चांग, एनर्जी एंड एंटरप्रायजेसचे हं लीन छुआ, लिना वानवानी आदींचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button