breaking-newsआंतरराष्टीय
सिंगापुरच्या माजी दुताला पद्मश्री पुरस्कार प्रदान
सिंगापुर – सध्या सिंगापुरच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापुरचे माजी राजदूत टॉमी कोह यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. यावर्षी भारत सरकारने असियान देशातील दहा जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले होते.
सिंगापुरचे पंतप्रान ली लूंग यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोह हे सध्या 80 वर्ष वयाचे असून त्यांनी सिंगापुरचे राजदूत म्हणून अमेरिका आणि संयुक्तराष्ट्रांमध्ये काम केले आहे. सध्या ते आंतरराष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटीचे प्रमुख म्हणून काम करीत आहेत. या पुरस्काराने आपल्याला खूप सन्मानित झाल्याचे वाटत आहे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.